कडधान्या मध्ये चवळी,हुलगा,मटकी,मुग,उडीद,घेवडाराजमा,मसूर,वाटाणा,सोयाबीन,वाल,हरभरा,तूर,कुळीथ / हुलगे,घेवडा / राजमा, इत्यादी पिकांचा समावेश होतो.कडधान्य लागवड नियोजन कसे करावे त्यासाठी लागणारे हवामान, माती, पाणी, खते कीटकनाशके बाजारपेठ प्रक्रिया उद्योग इत्यादी बाबी  असे अनेक प्रश्‍न सामान्य जणांच्या मनात उद्भवत असतात. अशा प्रश्‍नांची उत्तरे सरळ सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तुम्हाला ज्या भाजीपाल्या विषयी जाणून घ्यायचे आहे त्याच्यावर क्लिक करा

Sampl…

Sampl…

Sampl…

Sampl…

Sampl…

Sampl…

Sampl…

Sampl…

जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी आणि उत्पादकतावाढविण्यासाठी कडधान्य पिकांना अनन्यसाधारण महत्व आहे. ही पिके मुळांवरीलगाठीतून रायझोबियमद्वारे नत्रशोषून त्याचे स्थिरीकरण करतात.साधारणपणे २०-४० किलो नत्र प्रतिहेक्टरी स्थिर होतो. पिकांचा पाला जमीनीवर गळून जमीनीचापोत सुधारतो, जलधारणा शक्ती वाढते व रासायनिक खतांची बचत होवून जमीनभुसभुशीत राहते. कडधान्य पिकांची लागवड प्रामुख्याने मध्यम ते हलक्या, उथळ जमिनीत जिरायत क्षेत्रात केली जाते. या पिकांना सहसा खते दिली जात नाहीत. शिवाय तण,रोग आणि किडींमुळे त्यांचे अतोनात नुकसान होते. केवळ यामुळेच त्यांची उत्पादनक्षमता आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत आहे.कडधान्य पिके, पाऊस किंवा जमिनीतील ओलावा या प्रमाणेच हवामानाच्या इतर घटकांच्या, उदा. तापमान, हवेतील आर्द्रता, सूर्यप्रकाश यांच्यातील बदला बाबत देखील खूप संवेदनशील आहेत. या पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही.त्याच प्रमाणे त्यानां अधिक ओलावा किंवा जमिनीत पाणी साचून राहणे सहन होत नाही. क्षारांचे प्रमाण अधिक असणाऱ्या जमिनीत त्यांची उगवण आणि वाढ चांगली होत नाही.